GATE 2021 – GATE 2021: गेटची काऊन्सेलिंग प्रक्रिया लांबणीवर


GATE 2021 : GATE’s counseling process has been delayed. IIT Delhi has decided to postpone the process due to increased transmission of Kovid-19. The first round will start on May 28.

GATE 2021: गेटची काऊन्सेलिंग प्रक्रिया लांबणीवर. गेटची काऊन्सेलिंग प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. कोविड-१९ च्या वाढलेल्या संक्रमणामुळे ही प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय आयआयटी दिल्लीने घेतला आहे. पहिला राउंड २८ मे रोजी सुरू होणार आहे.

आता ही प्रक्रिया २८ मे २०२१ पासून सुरू होणार. देशात सध्या कोविड-१९ च्या वाढलेल्या संक्रमणामुळे हा निर्णय घेण्यात आला. या परिस्थितीमुळे काउन्सेलिंग आता थेट पाचव्या राउंटमध्ये सुरू होईल. ही प्रक्रिया व्हर्च्युअल पद्धतीने होईल. या अंतर्गत पहिला राउंड २८ मे रोजी सुरू होईल आणि ३० मे २०२१ रोजी संपेल. दुसरी फेरी ४ जून ते ६ जून २०२१ या कालावधीत होईल.

ज्या उमेदवारांनी GATE 2019, 2020, 2021 परीक्षा उत्तीर्ण केली आहे, ते काउन्सेलिंगसाठी पात्र असतील.

महत्त्वाच्या तारखा –

 • पहिली फेरी – २८ ते ३० मे २०२१
 • दुसरी फेरी – ५ जून ते ६ जून २०२१
 • तिसरी फेरी- ११ जून ते १३ जून २०२१
 • चौथी फेरी – १८ जून ते २० जून २०२१
 • पाचवी फेरी – २५ जून ते २७ जून २०२१

COAP 2021: अतिरिक्त फेरीच्या तारखा

 • राउंड A- २ जुलै ते ४ जुलै २०२१
 • राउंड B- ९ जुलै ते ११ जुलै २०२१
 • राउंड C- १६ जुलै ते १८ जुलै २०२१
 • राउंड D- २३ जुलै ते २५ जुलै २०२१
 • राउंड E- ३० जुलै ते १ ऑगस्ट २०२१

GATE 2021 परीक्षेचे स्कोअर कार्ड जाहीर

GATE 2021: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मुंबई अंतर्गत गेट 2021 स्कोअर कार्ड जारी केले गेले आहे. उमेदवार IIT गेटच्या अधिकृत वेबसाईट gate.iitb.ac.in वरून आपले स्कोअर कार्ड डाउनलोड करू शकतात किंवा खाली दिलेल्या लिंक वरून आपले स्कोअर कार्ड डाउनलोड करू शकतात. 


GATE 2021: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मुंबई अंतर्गत आयोजित इंजिनीअरिंगच्या पदव्युत्तर पदवी शिक्षणासाठी आवश्यक प्रवेश प्रक्रिया ‘गेट’ चे निकाल जाहीर करण्यात आलेले आहे. ही परीक्षा ६ व ७ आणि १३ व १४ फेब्रुवारी या चार दिवसांमध्ये पार पडली होती. इच्छुक उमेदवारांनी खालील लिक वरून आपले निकाल डाउनलोड करावे.


GATE 2021: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मुंबईने ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग (GATE 2021) परीक्षेची अंतिम उत्तरतालिका जाहीर केलेली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.


GATE 2021: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मुंबईने गेट 2021 चे प्रश्नपत्रिका व उत्तरतालिका जाहीर केलेल्या आहेत. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.


GATE 2021: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मुंबईने गेट २०२१ ची रिस्पॉन्स शीट जारी केली आहे. रिस्पॉन्स शीट डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना आपल्या क्रिडेंशियल्सच्या मदतीने अधिकृत वेबसाइट वर gate.iitb.ac.in वर लॉगिन करावे लागेल. IIT मुंबई ने ६ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत ग्रॅजुएट अॅप्टीट्यूड टेस्ट इन इंजिनीयरिंग (Gate) आयोजित केली होती.

गेट २०२१ परीक्षेत एकूण २७ विषय होते, यापैकी दोन विषय नवे होते. पर्यावरण विज्ञान आणि इंजीनियरिंग (ES) आणि मानविकी व समाजशास्त्र या दोन विषयांचा नव्याने समावेश झाला आहे. गेट २०२१ च्या सर्व विषयांसाठी एकूण उपस्थिती ७८ टक्के होती. गेट २०२० साठी देखील इतक्यात प्रमाणात उपस्थिती होती.

GATE 2021: रिस्पॉन्स शीट अशी करा डाऊनलोड

 • – सर्वात आधी अधिकृत वेबसाइट gate.iitb.ac.in वर जा.
 • – यानंतर पेजवर दिलेली लिंक “responses of candidates are available” वर क्लिक करा.
 • – आता रजिस्ट्रेशनच्या वेळी पाठवलेला आयडी किंवा ईमेल आयडी आणि GOAPS पासवर्डच्या मदतीने लॉग इन करा.
 • – आता सर्व माहिती सबमिट करून आपली रिस्पॉन्स शीट चेक करा.

जर कोणी उमेदवार आपला पासवर्ड विसरला असेल तर लॉग इन पेज वर दिलेल्या लिंकच्या मदतीने पासवर्ड पुन्हा क्रिएट करता येईल. GATE 2021 च्या आयोजनात ९ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. IIT मुंबई २२ मार्च रोजी निकालाची घोषणा करणार आहे. गेट २०२१ परीक्षा संगणकीकृत होती.


IIT GATE 2021 परीक्षा 5 फेब्रुवारीपासून

IIT GATE 2021: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) बॉम्बे शुक्रवार, ४ फेब्रुवारी २०२१ पासून ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग म्हणजेच GATE 2021 परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परीक्षा १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत सुरू राहणार आहे.

कधी होणार परीक्षा? 

अधिकृत शेड्यूलनुसार, गेट परीक्षा ५, ६, ७, १२, १३ आणि १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० आणि दुपारी ३ ते ६ अशी दोन सत्रात आयोजित करण्यात आली आहे. परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड जारी करण्यात आले आहेत. जे उमेदवार परीक्षेत सहभागी होणार आहेत, त्यांनी अधिकृत वेबसाइट gate.iitb.ac.in वर जाऊन अॅडमिट कार्ड डाउनलोड करायचे आहे. यावर्षी ९ लाखांहून अधिक उमेदवार परीक्षा देणार असल्याची शक्यता आहे. परीक्षा ५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

IIT मुंबईने परीक्षेसंबंधी काही दिशा-निर्देश जारी केले आहेत. ते पुढीलप्रमाणे –

 • – परीक्षा सुरू होण्याआधी एक तास अगोदर उमेदवारांनी GATE परीक्षा केंद्रावर पोहोचणे अनिवार्य आहे.
 • – प्रवेशद्वारावर उभे राहिल्यावर फरशीवरील खुणा,चिन्हांचे पालन करावे.
 • – जर कोणा उमेदवाराचे तापमान ९९.४ डिग्री हून अधिक असले तर त्याला परीक्षा केंद्रातील विलगीकरण क्षेत्रात बसून परीक्षा द्यावी लागेल.
 • – उमेदवारांना मास्क, हातमोजे आणि हँड सॅनिटायझर, पेन, अॅडमिट कार्ड, पारदर्शक पाण्याची बाटली आणि परीक्षेसंबंधीची अन्य ओळखपत्रे, प्रमाणपत्रे परीक्षा हॉलमध्ये घेऊन जाण्याची परवानगी असेल.
 • – परीक्षा संपल्यावर अत्यंत शिस्तबद्धपणे परीक्षा केंद्राच्या बाहेर पडावे.
 • – परीक्षा केंद्रावर दिलेल्या ड्रॉपबॉक्स मध्ये अॅडमिट कार्ड, रफ पॅड वगैरे ठेवावे.
 • – सोशल डिस्टेंसिंगचे पालन करावे.

GATE 2021 मध्ये दोन बदल झाले आहेत – दोन नवीन विषयांचा समावेश आणि GATE 2021 च्या पात्रता निकषांमध्ये सवलत.

GATE – पर्यावरण विज्ञान आणि इंजीनियरिंग (ES) आणि ह्युमॅनिटी आणि सामाजिक विज्ञान (XS) मध्ये दो नव्या विषयांसह, विषयांची एकूण संख्या २७ झाली आहे.


GATE 2021 : final chance to change exam centre city for gate 2021 exam – पदव्युत्तर पदवी इंजिनीअरिंग प्रवेशासाठी आवश्यक असेलेली ‘गेट’ प्रवेश प्रक्रिया (GATE 2021 Exam) यंदा ५ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्राचे शहर बदलण्यासंदर्भात विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात आलेल्या तक्रारी आल्या आहेत. या तक्रारीची दखल घेत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राचे शहर बदलण्याची शेवटची संधी आयआयटी मुंबईकडून (IIT Bombay) देण्यात आली आहे.

१४ व १५ डिसेंबरला विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राचे शहर बदलता येणार आहे. पदव्युत्तर पदवी इंजिनीअरिंग प्रवेशासाठी ‘गेट’ परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा आयआयटी मुंबईतर्फे आयोजित करण्यात येत आहे. नुकतेच परीक्षा समितीकडून परीक्षेसंदर्भातील माहिती https://gate.iitb.ac.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे परीक्षा केंद्राचे शहर बदलण्यासंदर्भातील अनेक तक्रारी परीक्षा समितीकडे आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि करोनाचा प्रभाव याची दखल घेत ‘गेट २०२१’ या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी दिलेले परीक्षा केंद्राचे शहर बदलण्याची संधी विद्यार्थ्यांना परीक्षा समितीने दिली आहे. त्यासाठी १४ व १५ डिसेंबरला आयआयटी मुंबईकडून ऑनलाईन पोर्टलची https://appsgate.iitb.ac.in ही लिंक पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

ही सुविधा पूर्णपणे मोफत देण्यात आली आहे. हॉलतिकिट जारी करण्याचे महत्त्वाचे काम शिल्लक आहे. त्यामुळे परीक्षा केंद्राचे शहर बदलण्याची विद्यार्थ्यांसाठी ही शेवटची संधी असेल, असेही आयआयटी मुंबईकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


GATE 2021 : gate exam 2021 will be conducted from 5 february 2021 – पदव्युत्तर पदवी इंजिनीअरिंग प्रवेशासाठी आवश्यक असेलेली ‘गेट’ ही प्रवेश प्रक्रिया यंदा ५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. देशातील आयआयटी, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस यांच्या प्रतिनिधींच्या गेट २०२१ कमिटीच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

पदव्युत्तर पदवी इंजिनीअरिंग प्रवेशासाठी ‘गेट’ परीक्षा घेण्यात येते. महामारीमुळे यंदा ही परीक्षा कशी आयोजित करायचे याचे आव्हन समितीसमोर होते. ही परीक्षा आयआयटी मुंबईतर्फे आयोजित करण्यात येते. यानुसार नुकत्याच झालेल्या बैठकीत ही परीक्षा रोज दोन सत्रांमध्ये घेण्याचे ठरविण्यात आले आहे. यावर्षी या परीक्षेत दोन अतिरिक्त विषयांचा समावेश झाल्याने ही परीक्षा २७ विषयांसाठी होणार आहे. एक विद्यार्थी एका अर्जावर दोन विषयांच्या परीक्षेला बसू शकतो.

अर्जदार विद्यार्थ्यांची संख्या पाहून भविष्यात सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात येईल असेही यावेळी ठरविण्यात आले. सध्या ही परीक्षा ५ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत पार पडणार आहे. याबाबतचा अधिक तपशील विद्यार्थ्यांना https://gate.iitb.ac.in या वेबसाइटवर उपलब्ध होईल.


GATE 2021: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई (IIT Bombay) ने अभियांत्रिकी पदवीधर एप्टीट्यूड टेस्ट इन इंजीनियरिंग (GATE 2021) साठी मॉक टेस्टची लिंक अॅक्टिव्ह केली आहे. मॉक टेस्ट लिंक अधिकृत वेबसाइट get.iitb.ac.in वर उपलब्ध आहे. गेट २०२१ साठी नोंदणी केलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन मॉक टेस्टमध्ये सहभाग घेऊ शकतात. यासाठी उमेदवारांना त्यांचे नोंदणी क्रमांक व पासवर्डने साइन इन करावे लागेल.

वेबसाइटवर विविध विषयांसाठी मॉक टेस्टची लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यंदा प्रथमच उमेदवारांना एकापेक्षा अधिक विषयांच्या परीक्षेत भाग घेण्याचा पर्याय आहे. GATE 2021 मध्ये दोन नव्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. दोन नवे विषय – पर्यावरण विज्ञान आणि इंजिनीअरिंग आणि मानवतावाद आणि सामाजिक विज्ञान यांचा समावेश गेट २०२१ मध्ये करण्यात आल्याने एकूण विषयांची संख्या आता २७ झाली आहे. सर्व विषयांच्या लिंक्स अधिकृत वेबसाइटवर सक्रिय करण्यात आल्या आहेत. उमेदवार मॉक टेस्टमध्ये भाग घेऊन संगणक आधारित चाचणी (CBT) प्रक्रिया समजून घेऊ शकतात. उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की अधिकृत साइटवर मॉक टेस्टची लिंक केवळ संगणक आधारित परीक्षेच्या अभ्यासासाठी आहे. प्रत्यक्ष परीक्षेतील प्रश्नांचे प्रकार, नमुना आणि स्वरूप वेगवेगळे असू शकतात.

पुढील स्टेप्सद्वारे द्या मॉक टेस्ट –

 • – मॉक टेस्टसाठी प्रथम अधिकृत वेबसाइट gt.iitb.ac.in वर जा. – मुख्यपृष्ठावर उपलब्ध असलेल्या GATE 2021 Mock Test लिंकवर क्लिक करा.
 • – आता एक नवीन पृष्ठ उघडेल. वेगवेगळ्या विषयांसाठी मॉक टेस्टची स्वतंत्र लिंक येथे आहे. – उमेदवाराने ज्या विषयासाठी अर्ज केला आहे त्याच्या लिंकवर क्लिक करा.
 • – आता पुन्हा आपल्यास नवीन पृष्ठावर आणले जाईल.
 • – येथे उमेदवारांनी आपला नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड देऊन साइन इन करावे. आता – आता आपण मॉक टेस्ट देऊ शकता.

GATE 2021 परीक्षा ५, ६, ७, १२, १३ आणि १४ फेब्रुवारी रोजी दोन सत्रात आयोजित केले जाईल. ऑनलाइन अर्ज पोर्टलवर उमेदवारांचे प्रवेशपत्र ८ जानेवारी २०२१ रोजी जाहीर केले जाईल. २२ मार्च २०२१ रोजी निकाल जाहीर केला जाईल.


GATE 2021 : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मुंबईने GATE 2021 परीक्षेसाठी अॅप्लिकेशन करेक्शन विंडो पुन्हा एकदा उघडली आहे. ज्या उमेदवारांनी गेट २०२१ परीक्षेसाठी अर्ज केले आहेत, ते आपल्या अर्जात २३ नोव्हेंबरपर्यंत सुधारणा करू शकतात. यापूर्वी ही मुदत १३ नोव्हेंबरपर्यंत होती. मात्र पुन्हा एकदा आयआयटी मुंबईने ही करेक्शन विंडो २३ नोव्हेंबरपर्यंत उघडली आहे.

GATE 2021

उमेदवार आपली कॅटेगरी, परीक्षा केंद्र ऑनलाइन पद्धतीने अधिकृत वेबसाईटद्वारे बदलू शकतील.

कधी होणार परीक्षा?

GATE 2021 परीक्षा ५, ६, ७, १२, १३ आणि १४ फेब्रुवारी रोजी आयोजित केली जाणार आहे. GATE 2021 साठी अॅडमिट कार्ड ८ जानेवारी २०२१ पासून उपलब्ध केले जाणार आहेत. या प्रवेश परीक्षेचा निकाल मार्च २०२१ मध्ये जारी केला जाणार आहे.

GATE 2021 मध्ये दोन नव्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. दोन नवे विषय – पर्यावरण विज्ञान आणि इंजिनीअरिंग आणि मानवतावाद आणि सामाजिक विज्ञान यांचा समावेश गेट २०२१ मध्ये करण्यात आल्याने एकूण विषयांची संख्या आता २७ झाली आहे.


गेट परीक्षेसाठी विलंब शुल्कासह अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

आयआयटी मुंबईने गेट २०२१ परीक्षेसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. ही परीक्षा देण्यास इच्छुक असलेले उमेदवार आता विलंब शुल्कासह १४ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करू शकतील. गेटचे अधिकृत संकेतस्थळ gate.iitb.ac.in वर विलंब शुल्कासह अर्ज करता येईल.

यापूर्वी विलंब शुल्कासह अर्ज करण्याची अंतिम मुदत १२ ऑक्टोबर २०२० होती. अधिकृत निवेदनात म्हटलं आहे की, ‘GATE 2021 साठी नोंदणी करण्याची अंतिम मुदत बुधवार १४ ऑक्टोबर सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे.’

परीक्षा कधी होणार?

परीक्षा ५,६,७,१२, १३ आणि १४ फेब्रुवारी रोजी आयोजित केली जाणार आहे. GATE 2021 साठी अॅडमिट कार्ड ८ जानेवारी २०२१ पासून उपलब्ध होती.

परीक्षेसाठी अर्ज कसा करायचा?

– नोंदणी
आपलं नाव, ईमेल आयडी आणि मोबाइल क्रमांक भरून GOAPS पोर्टलच्या माध्यमातून नोंदणी करा. एक पासवर्ड तयार करा.

-अर्ज भरा
सर्व महत्त्वाची, आवश्यक माहिती भरा आणि आपल्या सोयी आणि पसंतीनुसार गेट २०२१ पेपर आणि परीक्षा केंद्राची निवड करा.

– छायाचित्र अपलोड करा
आपलं छायाचित्रं स्कॅन अपलोड करा. स्वाक्षरी आणि कॅटेगरी सर्टिफिकेटही अपलोड करा.

– शुल्क
नेट बँकिंग किंवा डेबिट / क्रेडिट कार्डाद्वारे अर्जाचे शुल्क भरा.

– अर्ज सादर करा
सर्व माहिती एकदा नीट तपासून घ्या आणि अॅप्लिकेशन फॉर्म सबमिट करा.

परीक्षेसाठी नोंदणीची प्रक्रिया संपल्यावर उमेदवार एकदा आपला अर्ज एडिटही करू शकणार आहे. या दुरुस्तीसाठी २८ ऑक्टोबर रोजी आयआयटी मुंबई गेट पोर्टल उघडणार आहे. GATE 2021 साठी अर्ज केलेले उमेदवार GOAPS ऑनलाइन नोंदणी पोर्टलद्वारे gate.iitb.ac.in या संकेतस्थळावर अर्ज एडिट करू शकतील.

सोर्स : म. टा.Source link