NTA JIPMAT 2021 – ‘जीपमॅट’साठी अर्ज करण्यास मुदतवाढ!!


NTA JIPMAT 2021 : The deadline to apply for ‘Jipmat’ has been extended. This will be the first time that students will be admitted to the Indian Institute of Management (IIM) in Jammu and Bodh Gaya after Class XII.

NTA JIPMAT 2021 : ‘जीपमॅट’साठी अर्ज करण्यास मुदतवाढ!! ‘जीपमॅट’साठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. बारावीनंतर विद्यार्थ्यांना जम्मू आणि बोधगया येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये (आयआयएम) प्रवेश घेता यावा, यासाठी पहिल्यांदाच ही परीक्षा होणार आहे.

विद्यार्थ्यांना आता ३१ मेपर्यंत परीक्षेसाठी अर्ज करता येणार असून, अर्जात बदल करायला असल्यास पाच ते १० जूनचा अतिरिक्त कालावधी देण्यात आला आहे. जून महिन्याच्या शेवटी किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही परीक्षा पार पडेल, असे संकेत नॅशनल टेस्टिंग एजन्सीने दिले आहेत.

बारावी नंतर ‘आयआयएम’मध्ये प्रवेश मिळावा, यासाठी पहिल्यांदाच केंद्र सरकारने जीपमॅट घेण्याचा निर्णय घेतला असून, या वर्षीपासून ही परीक्षा होणार आहे. अहमदाबाद, कोलकाता, बेंगळुरू; तसेच देशातील इतर काही शहरांमध्ये असलेल्या ‘आयआयएम’मध्ये केवळ पदव्युत्तर पदवी दिली जात होती.Source link